साक्री। आज शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा शिरसोले तालुका साक्री येते. जागतिक युवा कौशल्य दिन प्राचार्य निकम यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य अनिल चव्हाण ,प्रा. नलावडे, प्रा पी के पवार, प्रा संतोष गिरी , हर्षमाला ठाकरे , कविता पाटील मनीषा गणवीर , जोती आहिरे हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मल्टीस्किलचे शिक्षक योगेश माळी यांनी केले. मुलींनी भाषणे जागतिक युवा युवती स्किल दिना निमत्ताने दिली. तसेच या वेळी रांगोळी मेहंदी तक्ते चित्रकला आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
कौशल्य विकासावर मार्गदर्शन
विजय खैरनार , बाळासाहेब नलावडे , अनिल चव्हाण, मुरलीधर निकम , हर्षमाला ठाकरे यांनी जीवन कौशल्य व आश्रम शाळा कायापालट अभियान वॉश कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. मल्टीस्किलचे शिक्षक योगेश माळी व ब्युटी स्किल च्या शिक्षक रंजना नेवरे मॅडम यांनी कौशल्य विकास वर उल्लेख निय मार्गदर्शन केले कार्यकर्मचे सुत्रसंचलन व आभार विजय खैरनार यांनी मानले.