शिंदाड । शिंदाड-पिंपळगाव गटात होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तसेच तालुकाध्यक्ष अॅड.अभय पाटील यांनी गटात आघाडी घेत इतर उमेदवारांपेक्षा अधिक लोकप्रियता मिळवली आहे. विद्यमान जि.प.सदस्य यांनी गटात गेल्या वर्षात कोणतेही विकासाचे धोरण न अवलंबता फक्त अपुर्ण विकास करुन ठेवला आहे. त्याची प्रचंड चीड लोकांच्या मनात असुन भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साटे-लोटे आहे. हेही लोकांना कळुन चुकले असल्याने आता फक्त निर्भीड असलेले अभय दादाच यातुन तारतील व विस्कटलेली विकासाची घडी पुन्हा बसवतील अशी अपेक्षा लोकांमधुन व्यक्त होत आहे. शिंदाड पंचायत समतीसाठी अनिता विष्णू पवार तसेच पिंपळगाव पं.स.साठी शाहीन बी.नवाब पठाण यांना उमेदवारी देत सर्व समाजाला न्याय देण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे.
यांची होती उपस्थिती
प्रचार रॅलीला सदाशिव पाटील, भास्कर व्यवहारे, मिलींद साळवे, शशी पाटील, डिगंबर पाटील, बाळू सवर्णे, सोमनाथ तुपे, रविंद्र पाटील, आबा पाटील, नाना पाटील, प्रभाकर न्हावी, विजय चौधरी, शेकील खाटीक, शेरीफ खाटीक, शिवा पाटील, विकास पाटील, भागवत पाटील, बापू पाटील, जितू पाटील, राजेंद्र भोणे यांच्यासह गावचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारचा प्रचार रॅलीत सहभाग मोठ्या संख्येने उपस्थिती होती.