अमळनेर। तालुक्यातील शिरुड येथे शेतात जमा करून ठेवलेल्या चार्यावर विजेच्या खांब पडल्याने तारांमध्ये घर्षण होऊन आग लागल्याने चारा जळून खाक झाला. ही घटना शुक्रवार 21 रोजी घडली. 25 ते 30 ट्रॅक्टर जमा करून ठेवलेला चारा नष्ट झाला आहे. यात शेतकर्याचे सुमारे एक ते दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरुड येथील रहिवासी गुलाबराव मधुकर पाटील यांच्या शेतात बाजरी, मका, ज्वारीचा चारा कुट्टी करण्यासाठी जमा करून ठेवला होता. दुपारच्या सुमारास शेतातील खांब हवेमुळे तुटून पडल्याने तारा एकमेकांवर घर्षण होऊन ठिणगी पडून चार्यास आग लागली.
चार खळे पुर्णपणे जळुन खाक
चारा पूर्णपणे जळून खाक झाला गावात जंगलातून धूर निघत असल्याचे निदर्शनात आल्याने गावातील नागरिकांनी अमळनेर नगरपरिषदेतील अग्निशमन दलाला फोन करून एक बंब मागविला. परंतु हवा जास्त असल्याने चारा 30 मिनिटात जळून खाक झाला. घटनेचा पंचनामा शिरुड तलाठी वाल्मिक पाटील यांनी केला. शेतकरी गुलाबराव पाटील यांच्या कडे 20 ते 25 जनावरे आहेत. अग्निशमन दलाचे वाहन लवकर पोहचले नसते तर शेजारील इतर शेतक़र्यांचा चाराही शेतात जमा होता. त्यामुळे तेही जळण्याची शक्यता होती. यावेळी विजवितरण कंपनीचे सहायक अभियंता अंकुश सरोदे ,सहाय्यक अभियंता संकेत मालठाणे, वायरमन निवृत्ती पाटील ,भानुदास पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली.