शिरूडच्या सरपंचपदी बापूराव महाजन बिनविरोध निवड

0

अमळनेर । तालुक्यातील शिरुड येथील सरपंच महेंद्र पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर बापूराव महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश पाटील यांनी काम पाहिले. शिरुड तलाठी वाल्मिक पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच आबा काशिनाथ पाटील, ग्रा.पं. सदस्य भाईदास पाटील, सुपडू पाटील, भारती पाटील, सुनीता यांनी पाटील, सरला महाजन, पुष्पांबाई बोरसे, हिराबाई भिल, यशोदाबाई बैसाणे, ग्रामसेवक विलास सोनवणे, श्याम अहिरे, सुभाष पाटील, ग्रामस्थ जयवंतराव पाटील, वसंत पाटील, पोलीस पाटील विश्वास महाजन उपस्थित होते.