शिरूड येथे दर रविवारी‘दोन तास’ गाव स्वच्छतेसाठी

0

अमळनेर । तालुक्यातील शिरूड येथील तरुणांनी गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे व गाव स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी स्वयं प्रेरणेने गावात स्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ केले. तसेच दर रविवारी गावासाठी 2 तास वेळ देवून गावातील विविध समस्यां सोडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गावात स्थापन केलेल्या शिरुड विकास मंचच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवावा असा निर्णय घेण्यात आला. संभाजी बिग्रेड ग्रुप ,संघर्ष ग्रुप, एस.एस.सी.ग्रुप, महारुद्र व्यायाम शाळा, संत सावता माळी ग्रुप, कालभैरव मित्रमंडळ , मॉ.दुर्गा मित्र मंडळ, विजय क्लासेसचे विद्यार्थी , व्ही.झेड.पाटील हाइस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.

सरपंच बापूराव महाजन, श्याम अहिरे, प्रा.सुभाष पाटील, ग्राप सदस्य भाईदास पाटील, रवि धनगर, शरद कुलकर्णी, विश्वास महाजन, प्रफुल पाटील, जे.एम.पाटील, संजय बोरसे, नंदू अहिरे, वसंत पाटील, विनोद पाटील, हरीश पाटील आदी अनेकांनी गाव स्वच्छ केले.