शिरूरमधून आढळराव पाटील चौकार मारतील

0

शिवसेना मेळाव्यात रवींद्र मिर्लेकर यांचा विश्वास

हडपसर : शिरूर लोकसभा मतदारसंघात 14 हजार कोटींची विकासकामे राबविणारे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विकासकामांच्या जोरावर विजयाचा चौकार मारतील, असा विश्वास शिवसेना नेते माजी संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी हडपसर येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कन्यादान मंगल कार्यालयात शिवसैनिकांचा मेळावा मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी मिर्लेकर हे बोलत होते. मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शिवाजीराव आढळराव, पुणे शहर प्रमुख माजी आमदार महादेव बाबर, महिला आघाडी प्रमुख नगरसेविका संगीता ठोसर, शहर सहसंघटक विजय देशमुख, पुणे उपशहर प्रमुख समीर तुपे, नगरसेवक नाना भानगिरे, नगरसेविका प्राची आल्हाट, गट समनव्यक प्रभाकर कदम, दिलीप कवडे, गंगाधर बधे, जयसिंग भानगिरे, विक्रम लोणकर, प्रसाद बाबर,शिवा शेवाळे, अभिमन्यू भानगिरे, विजय कामठे,जाण मोहमद, राम खोमणे, अप्पा गायकवाड,वत्सला घुले,विकास बधे, वीरभद्र गाभने, जितूअप्पा कदम आदी उपस्थित होते.

शिवसेनेची लोकहिताची भूमिका…

रवींद्र मिर्लेकर पुढे म्हणाले, शिवसेनेने सातत्याने लोकहिताची भूमिका घेतल्याने आज महाराष्ट्रवासीय सेनेच्या पाठीशी उभे राहिले आहेत, खासदार आढळराव पाटील यांनी आपल्या राजकीय वाटचालीत सर्व स्थरांमधील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने ते यावेळीही विक्रमी मताधिक्यानं निवडून येतील, शिवसैनिकांनी प्रत्येक बूथ हा मजबूत किल्ला बनवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.