शिरूर तालुक्याचा निकाल 93.71 टक्के

0

शिक्रापूर । फेब्रुवारी-मार्च 2018 दहावीच्या निकालात शिरूर तालुक्याने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. तालुक्याचा निकाल 93.71 टक्के लागला असून विद्यार्थी गुणवत्तेत वाढ झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील 10 विद्यालयांनी 100 टक्के निकाल लावत यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. शिरूर तालुक्यात एकूण 74 माध्यमिक विद्यालये असून 93.71 टक्के निकाल लावत तालुक्याची शान उंचावली आहे. शिरूर तालुक्यातून एकूण 6175 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 5787 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

विषयनिहाय संकल्पना समजून घेत सराव
जातेगाव बुद्रुक येथील संभाजीराजे विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांनी सांगीतले की, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, चिकीत्सक दृष्टीकोनातून अभ्यास करत विषयनिहाय संकल्पना समजून घेत सराव केला. निव्वळ पाठांतरापेक्षा गणित, विज्ञान विषय पायरीने अभ्यासात सातत्य राखले. शिरूर तालुक्याच्या इतिहासात हा निकाल अभिमानास्पद आहे. दहावी परीक्षेत 100 टक्के निकाल लागलेल्या विद्यालयात स्व. संभाजीराव पलांडे प्रगती विद्यालय, मुखई, तात्यासाहेब सोनवणे विद्यालय, निर्वी, आदर्श विद्यालय वरूडे, अप्पासो पवार विद्यालय बाभुळसर, स्व. आबासाहेब पाचंगे विद्यालय ढोक सांगवी, श्री. काळभैरव विद्यालय कोयाळी पुर्नवसन, शिक्रापूर, फ्रेंडस इन्स. कोरेगांव, स्व. आर. जी. पलांडे आश्रमशाळा, पद्ममणी विद्यालय, पाबळ, विजयमाला विद्यामंदिर शिरुर यांचा समावेश आहे.

संभाजीराजे विद्यालयाचा निकाल 98 टक्के
जातेगांव बुद्रुक येथील संभाजीराजे विद्यालयाचा निकाल 98 टक्के लागला आहे. 18 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह 26 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षकांचे नियोजनबध्द वार्षिक नियोजन, घटकनिहाय चाचणी परीक्षा सराव, विशेष अभ्यास वर्गाचे नियोजन, चाचणी, सत्र, वार्षिक परीक्षा सराव तसेच राज्य मंडळ अभ्यासक्रम प्रश्‍न संचिका व आदर्श उत्तरपत्रिकांचा सराव यामुळे हे यश प्राप्त झाले आहे, अशी प्रतिक्रीया प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली.
विद्यालयांत प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी : प्रथम साक्षी शहाजी उमाप : (94 टक्के), द्वितीय मोनिका बाबुराव उमाप (93 टक्के), तृतीय श्रेया श्रीकांत धुमाळ (90 टक्के), विद्यार्थांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुगंध राव उमाप व सचिव प्रकाश पवार यांनी विद्यार्थी व शिक्षकांस शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्य पशुसंवर्धन आयुक्त व संस्था मार्गदर्शक कांतीलाल उमाप यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले आहे.