खेड : आंबेगाव, जुन्नर आणि शिरुर तालुक्यावर शरद पवारांचे खुप मोठे उपकार आहेत. 1972 च्या दुष्काळात शेतकर्यांसाठी शरद पवारांनी धरणांची उभारणी केली. चारही तालुके आज पाण्याखाली आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी पवार परिवारातील युवा नेतृत्व रोहित पवारांना शिरुर लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी राजगुरूनगर येथे आयोजित युवक मेळाव्यात बोलताना केली.
हे देखील वाचा
पवारांच्या उपकारांची परतफेड करा…
या भागात रोजगार उपलब्ध होत नव्हता, 72 सालचा दुष्काळ सर्वांनी अनुभवला आहे. सुकडी खाऊन आम्ही दिवस काढले आहे. मात्र आता हे चित्र बदलले आहे. हा बदल शरद पवारांमळे शक्य झाला आहे. त्यामुळे या उपकारांची परतफेड आम्हाला करायची आहे. त्यासाठी रोहित पवारांना शिरुर लोकसभेची उमेदवारी द्या, असे आवाहन कार्यकर्त्यांच्या साक्षीने माजी आमदार मोहितेंनी यावेळी केले. लोकसभा तोंडावर येत असताना शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव यांच्या समोर थेट लढत देण्यासाठी राष्ट्रवादी उमेदवार अजुनही जाहीर करत नाही. त्यातून युवक मेळाव्यात पवारांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी युवा नेतृत्व रोहित पवारांना उमेदवारी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीला तरुणांसह कार्यकर्त्यांनी हात वर करुन प्रतिसाद दिला.