वाघोली । येत्या 15 डिसेंबरपर्यंत शिरूर-हवेली मतदारसंघ खड्डेमुक्त केला जाईल व प्रत्येक कामांवर जातीने लक्ष ठेवून कुठे निकृष्ट प्रतीचे काम आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिले.वाघोली ते केसनंद (ता. हवेली) या रस्त्यावर खड्डे बुजवाण्याचे काम सुरू झाले असून यावेळी आमदार पाचर्णे आवर्जून उपस्थित होते. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शिरूर-हवेलीतल्याच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून तात्पुरते खड्डे बुजवण्याचा प्रकार बंद करण्यात येत आहे.
तसेच बुजवलेले खड्डांचे फोटे हे थेट मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवाण्यात येणार आहेत. या खड्डांसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची तपासणी वरिष्ठ अधिकार्यांमार्फत होणार आहे. किती खड्डे बुजवले त्यांचा डायमीटर यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून परत खड्डे पडल्यास ठेकेदार जबाबदार राहणार आहे, अशी माहिती मंगळवारी आमदार पाचर्णे यांनी दिली.यावेळी घोडगंगाचे संचालक कैलासराव सोनवणे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.