पारोळा । राजकारणाबरोबर सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत येथील माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोडे व परिवाराने स्व. सावित्रीबाई शिरोडे मातोश्रींच्या स्मरणार्थ शहरातील तीन ठिकाणी पाणपोईचे (अॅक्वा वॉटर) लावून तहानलेल्यांची तहान भागवून आशिर्वाद घेत शिरोडे परिवाराने सामाजिक बांधिलकी जोपासली असून यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे खासदार ए.टी. पाटील यांनी सांगितले.
बसस्थानक, गावखेडी चौक, कोर्टाजवळ या ठिकाणी पाणपोईचे उद्घाटन करतेवेळी ते बोलत होते. उन्हाळ्यात बसस्थानक परिसरासह दोन ठिकाणी पाणपोई लावून खर्या अर्थाने माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोडे यांनी जनसेवक हीच आमची खरी ओळख यावेळी सांगितली. मान्यवरांकडून झाले कौतूक यावेळी माजी जि.प. सदस्य बाळासाहेब पाटील, गोविंद शिरोडे नगरसेवक नितीन सोनार, प्रकाश महाजन, अशोक चौधरी, महेश चौधरी, मनोज जगदाळे, पो.नि. भाऊसाहेब पटारे, अॅड अतुल मोरे, रविंद्र पाटील, मुकुंदा कोठारी, प्रमोद कासार, रावसाहेब गिरासे, सुनिल भाऊराव व गौतम वानपेडे, विकास शिरोडे, चंद्रकांत शिरोडे उपस्थित होते. ऐन उद्घाटणात बसस्थानक, गांवहोडी चौक, कोर्ट परिसरात स्वखर्चातून आरओ पाण्याच्या पाणपोई लावली.