सावदा- सावदा येथील साईबाबा बहुउद्देशीय संस्था अंतर्गत साई ग्रुप मित्र मंडळातर्फे साईधाम मंदिरापासून 24 रोजी दुपारी चार वाजता शिर्डीकडे पालखी पदयात्रा रवाना होणार आहे. तत्पूर्वी पहाटे पाच वाजता प्रमोद बाबुलाल तेली व संगीता प्रमोद तेली यांच्या हस्ते काकडा आरती, सकाळी सात वाजता कुशल सुरेंद्र जावळे व विजया कुशल जावळे यांच्या हस्ते होम प्रज्वलन, दुपारी दोन वाजता सत्कार समारंभ व बक्षीस वितरण, दुपारी तीन वाजता अॅड.रजनीश मोरेश्वर राणे व हेमांगी रजनीश राणे यांचे हस्ते पालखी अभिषेक होवून दुपारी चार वाजता महंत कृष्णगिरीजी महाराज, सोमवारगिरी मठ यांच्या हस्ते पालखी पूजन होईल. यानंतर पालखीचा शुभारंभ नगराध्यक्षा अनिता पंकज येवले, रेखा राजेश वानखेडे, माजी नगरसेविका बेला कैलाशचंद्र खंडेलवाल यांच्या हस्ते होईल. यावेळी सावद्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ व मोहिनी वाघ यांच्या हस्ते महाआरती होईल. प्रसंगी नगरसेवक राजेश गजाजन वानखेडे, राजेंद्र श्रीकांत चौधरी, नंदा मिलिंद लोखंडे नगरसेविका, जयश्री अतुल नेहेते, लकी शेठ गुजराल, संजय बुधो भिरुड, हिरालाल व्यंकट चौधरी, महेश भागवत चौधरी (पप्पू शेठ) भुसावळ, अजय भागवत भारंबे, किशोर सदाशीव बेंडाळे, अतुल सुधाकर नेहेते, पंडित रामभाऊ चौधरी, आदी मान्यवर उपस्थित राहतील. उपस्थितीचे आवाहन साई मित्र मंडळाचे मुख्य मार्गदर्शक बाळासाहेब मोरेश्वर राणे तथा साईधाम मंदिर, साई ग्रुप, सावदातर्फे करण्यात आले आहे.