शिर्डी विमानतळ उद्घाटनाला राष्ट्रपती येणार

0

नगर । राष्ट्रपती रामनाथ कोविंद 1 ऑक्टोबरला शिर्डी विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. रा विमानतळाचा व्यावसायिक वापर करण्यास हवाई वाहतूक महासंचालनालराने परवानगी दिली. 1 ऑक्टोबरपासून साईबाबा समाधी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शिर्डी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार आहे.‘महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी’ने शिर्डी विमानतळाची उभारणी केली आहे. मालकीदेखील याच कंपनीकडे आहे ’ अशी माहिती ‘एमएडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकनी यांनी दिली.

भविष्यात रात्रीच्या उड्डाणाची योजना
‘शिर्डीतील विमानतळावरुन एअर इंडियाचा भाग असलेल्या ‘अलायन्स एअरवेज’चे विमान पहिले उड्डाण करेल. या विमानतळाचा व्यावसायिक वापर 2 ऑक्टोबरपासून सुरु होईल,’ असेही त्यांनी सांगितले. या विमानतळावरुन भविष्यात रात्रीच्या वेळीही विमानाचे उड्डाण करण्याची योजना आहे. नवी दिल्ली, हैदराबाद विमानतळांसोबत शिर्डी विमानतळ जोडले जाणार आहे. शिर्डीत दररोज 80 हजार साईभक्तांची ये-जा सुरु असते. या विमानतळामुळे साईभक्तांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

दोन मार्गांसाठी दोन कंपन्रा
सध्या या विमानतळावरुन सेवा देण्यासाठी ‘अलायन्स एअर’ आणि हैदराबादस्थित ‘ट्रूजेट’ने उत्सुकता दर्शवली आहे. यासाठी या दोन्ही कंपन्यांनी अर्जही दाखल केले आहेत. ‘अलायन्स एअर’ ‘मुंबई-शिर्डी’ मार्गावर हवाई सेवा देणार आहे, तर ‘ट्रूजेट’कडून ‘हैदराबाद-शिर्डी’ मार्गावर सेवा दिली जाणार आहे. याशिवाय ‘इंडिगो’नेदेखील अर्ज केला आहे. ‘डीजीसीए’ने व्यावसायिक परवाना दिला आहे.