वाल्मिक मेहतर समाजातर्फे बाजारपेठ पोलिसांना निवेदन
भुसावळ : अभिनेता सलमान खान व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी एका मुलाखतीत जातीवाचक शब्दाचा जाहिर उल्लेख करून वाल्मिक मेहतर समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक वाल्मिक मेहतर समाजाने बाजारपेठ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. उभयंतांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
राजू खरारे, रंजित खरारे, विजेंद्र सारसर, अनिल लोट, जितेंद्र पिवाल, विशाल चावरे, नीलेश बागरे, संदीप ढिंक्याव, भूषण टाक, सागर चंडाले, सोनू चावरीया, राजा गोहर, राहुल टाक, पवन ढिंक्याव, कमल बागरे, मोनी खरारे, किसन चावरीया, गोपाल संगेले, राहुल गोहर, विशाल पथरोड, राहुल जाजोट, मनोज बोयत, विपी चंडाले, अनिल टाक, सचिन सावळे, संतोष तुरकेले, लखन नरवाडे आदींच्या सह्या आहेत.