जळगाव- शहरातील सुप्रिम कॉलनी येथे शिळे अन्न खाल्याने अन्नातून सहा बालकांसह दोन महिलांना विषबाधा झाल्याची घटना गुरूवारी दुपारी 12 वाजता उघडकीस आली. प्रकृति ढासळलेल्या आठही जणांना जणांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून सर्व जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.
सुप्रिम कॉलनी येथे आसीफ मिस्तरी हे राहतात. बुधवारी घरी नातेवाईक आले असल्याने त्यांनी सायंकाळी घरी जेवनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यामुळे त्यांच्याकडील कामगार व त्यांची मुले देखील जेवनासाठी आले होते. जेवन आटोपल्यानंतर उरलेले अन्न आसीफ यांनी घरातच ठेवले तर काही कामगारांनी वाटून दिले. गुरूवारी सकाळी हे ठेकेदार असल्याने ते साईडवर निघून गेले. आलेल्या नातेवाईकांनी उरलेले शिळा शिरा बालकांना खाण्यास दिला. तर गल्लीतीलच कामगारांनीही मुलांना शिळा शिरा खाण्यास दिला. दुपारी 12 वाजेच्या सुमारास सदर अन्न खाल्ल्यानंतर मुलांना व दोन महिलांना उलट्याचा त्रास जाणवू लागला. यानंतर आसीफ मिस्तरी यांना मुलांना व महिलांना शिळ्या अन्नातून उलट्या होवून विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घरी आले. यानंतर मुलांसह महिलांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
विषबाधा झालेल्या आठ बालकांसह दोन महिलांमध्ये अदनाम शेख नुर (4), अझर रफा शेख मौसीन (3), नाझमिन शेख खालीद (2), महेक शेख आसीफ (2),अलफिया शेख शकील (3), सावित्री प्रितमसिंग राठोड (40), रहिमा बी शेख रसिद (45), अलिया शकील पटेल (3) सर्व रा. सुप्रिम कॉलनी यांचा समावेश आहे. प्रकृती ढासळलेल्या बालकासंह महिलांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या सर्व मुलांवर रूग्णालयात उपचार सुरू असून सर्व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, यावेळी बालकांच्या व महिलांच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात एकच गर्दी केली होती.