शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन तरूण पिढीसाठी पर्वणी

0

आ. स्मिता वाघ यांचे प्रतिपादन

जळगाव- शिवकालीन शस्त्रास्त्रांची ओळख ही तरूण पिढीसाठी आणि जळगावकरांसाठी पर्वणीच असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार तथा आ. स्मिता वाघ यांनी आज येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त ज्ञान योग संस्थेतर्फे आयोजीत शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अनुभूतीच्या संचालिका निशा जैन, हेतल पिपरीया, कोल्हापुरचे गिरीश जाधव, जिल्हापेठचे पोलीस निरीक्षक विलास सोनवणे, युवाशक्तिचे विराज कावडीया, बबलु पिपरीया उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला आ. स्मिता वाघ व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पुजन करण्यात आले. जिल्हापेठ पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांनी सध्याच्या युगात बुध्दी, ज्ञान आणि तंत्रज्ञान हे तीन शस्त्रे असुन तरूणांनी शिवरायांचा आदर्श घेऊन प्रगतीची पताका फडकावावी. निव्यर्सनी आणि निरोगी राहुन राष्ट्रसेवा करण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी आ. स्मिता वाघ, पोलीस निरीक्षक विलास सोनवणे, निशा जैन, यांनी प्रदर्शनात ठेवलेल्या शस्त्रास्त्रांची पाहणी केली. यशस्वीतेसाठी शिवप्रभात मंडळ, मोरया गृपने परीश्रम घेतले.