शिवकृपा असेल तर पुन्हा अमरनाथला जाईन

0

अहमदाबाद । जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यानंतर त्या बसचा चालक सलीम शेख सध्या चर्चेत आहे. दहशतवाद्यांनी ज्या बसला लक्ष्य केले त्याचा चालक सलीमने अनोखे शौर्य् दाखवत 50 लोकांचे प्राण वाचवले. मला भारतीय असण्यावर गर्व आहे आणि भगवान शिवजींच्या मनात असेल तर मी पुन्हा अमरनाथला जाईन, असा दृढ विश्‍वास शेख याने व्यक्त केला.

7 जीव वाचवले नसल्याची खंत

मी खूप हैराण आहे. दु:खी आहे. संपूर्ण दिवस मी अतिरेकी हल्ल्याबद्दल विविध राजकारण्यांची विधाने ऐकत होतो. मला राजकारण कळत नाही. बसमधल्या सर्व प्रवाशांचे प्राण मी वाचवू शकलो नाही, याचे मला दु:ख आहे. ते 7 जीव वाचवू शकलो नाही याची मला आयुष्यभर खंत राहील.