जळगाव – शिवकॉलनी येथे महामार्गालगतच्या स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. रक्कम असलेले मशीन तोडण्याचा प्रयत्न होताच अलार्म वाजल्याने चोरट्याने तातडीने धूम ठोकली.
हा अलार्म वाजल्याने एटीएममधील 10 लाखांची रक्कम सुरक्षित राहिली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हेल्मेट घातलेला एक चोरटा चोरीचा प्रयत्न करीत असल्याचा प्रकार एटीएममधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.