शिवकॉलनीत माजी सैनिकाचे बंद घर चोरट्यांनी फोडले

0

जळगाव : शहरात चोर्‍या, घरफोड्यांचे सत्र सुरुच असून शिवकॉलनीतील माजी सैनिकाचे बंद घर चोरटयांनी टार्गेट करून 28 ग्रॅम वजनाचे दागिने लांबवून नेल्याची घटना फेब्रुवारी 11 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल
याबाबत प्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवकॉलनीतील भास्कर हौसिंग सोसायटीमध्ये माजी सैनिक अरुण वाघ यांचे असून ते परिवारासह दि.10 रोजी सकाळी शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील 28 ग्रॅम वजनाचे दागिने असा 51 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. दरम्यान दि.11 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास वाघ कुटुंबिय घरी आले असता, त्यांना मुख्य दरवाज्याचे कुलुप तुटलेले दिसले. बेडरुममधील दोन कपाटाचे लॉक तोडून चोरटयांनी 28 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी वाघ यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातील काही दागिने सुरक्षित
वाघ यांच्या घराच्या वरील मजल्यावरील कपाटाला कुलुप असल्याने चोरटयांनी टॉमीच्या साहाय्याने कपाटाचा दरवाजा तोडला. कपाटातील सेंटल लॉक न उघडल्याने कपाटातील तीन ग्रॅम वजनाचे दागिने सुरक्षित राहीले. घटनास्थळी ठस्से तज्ज्ञांनी येवून कपाटाजवळील हाताच्या ठस्सांचे नमुने ताब्यात घेतले आहे. दरम्यान परिसरात महिन्याभरात ही दुसरी चोरीची घटना घडली असून रात्रीची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.