जळगाव । एरंडोलकडे जाणार्या पोल्ट्री फॉर्मच्या गाडीला मागून भरधाव वेगात येणार्या इन्होवाने जोरदार धडक दिल्याची घटना आज रविवारी घडली. ही घटना सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास शिवकॉलनी पुलावरील महामार्गावर घडली. या अपघातात पोल्ट्री फॉर्मच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले मात्र यात इन्होव्होच चांगलेच नुकसान झाले होते. या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुक पोलीसांनी घटनास्थळी येवून वाहतुक सुरळीत केली. दोन्ही वाहन चालकांनी कोणतीही तक्रार न केल्याने याबाबत पोलीसात नोंद नाही.
अचानक बे्रक लावला अन् ‘इनोव्हा’ धडकली
पिलखोड येथील मन्यार पोल्ट्री फॉर्मची चारचाकी गाडी (क्रं.एमएच.04.ईएल.7191) ही आकाशवाणी चौकाकडून एरंडोलच्या दिशेने महामार्गावरून सकाळी 7 वाजेच्या सुमारास जात होती. यानंतर 7.30 वाजता शिवकॉलनी पुलावरून जात असतांना पुढे चालणारी रिक्षाने पुलाच्या बाजुला असलेल्या उताराच्या कच्च्या रस्त्यावरून पिंप्राळाकडे जाण्यासाठी रिक्षा वळवली व उतारावरून रिक्षा खाली उतरवत होता. हे लक्षात येताच पोल्ट्री फॉर्मच्या गाडीने अचानक पुलाच्या काही अंतरावर अचानक ब्रेक लावला. गाडी महामार्गावर थांबताच मागून भरधाव वेगात येणारी इन्होव्हा (क्रं.एमएच.19.सीएफ.3503) जोरदार धडक दिली. यात इन्होव्हा गाडीचे बोनटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतू सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. अपघात होताच दोन्ही चारचाक्या रस्त्यातच उभ्या असल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली. वाहतुक पोलीसांना घटनेची माहित मिळताच दोन कर्मचारी घटनास्थळी पोहचून त्यांनी अपघातग्रस्त दोन्ही चारचाक्या बाजुला करून वाहतुक सुरळीत केली. मात्र, दोन्ही चालकांनी तक्रार याबाबत कोणतीही तक्रार न दिल्यामुळे पोलीसात नोंद नाही.