चिंचवड – येथील शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात आणि श्रीमती सी. के. गोयल प्राथमिक विद्यायात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू स्नेहल माने व एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक भीमराव शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील, सह उपप्रादेशिक अधिकारी एस. बी. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब जाधव, जगदिश जाधव, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अमित बच्छाव, संचालक विजय जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत, स्वागतपर गीते, देशभक्तीपर गीते, पूजा नृत्य, पोवाडा, देशभक्तीपर कविता, श्री देवा गणेशा आदी कार्यक्रम सादर केले. तसेच मल्लपटुंनी मल्लखांबांवरील आसने सादर केली.