नवापूर । नवापूर एज्युकेशन सोसायटी संचालित सार्वजनिक प्राथमिक शाळेत शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष शिरिषभाई शाह, प्रमुख अतिथी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, नगरसेवक अजय पाटील, नगरसेविका मेघा जाधव, हरीशचंद्र पाटील, संदीप पाटील, मुख्याध्यापक महेश पाटील, संजीव पाटील, मिलिंद वाघ, निलेश प्रजापत उपस्थित होते. यावेळी शिरिषभाई शाह यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे विद्यार्थी हर्षित मोरे, अंशू सोनवणे, तेजल जगताप यांनी बाल शिवाजी महाराज व मनस्वी पाटील, विषा सोनार, कृपा पाटील, वेदिका चव्हाण, मुद्रा पाटील, दीक्षा पाटील यांनी जिजामाता यांची वेशभूषा धारण करून नृत्य,पोवाडे,गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक महेश पाटील यांनी संचालन योगिता पाटील तर आभार माधुरी चित्ते यांनी मानले.
मुकेशभाई पटेल मिलीटरी स्कूलमध्ये शिवजयंती साजरी
शिरपूर । विलेपार्ले केलवणी मंडळ मुंबई संचलित मुकेशभाई आर. पटेल मिलीटरी स्कूल व कनिष्ठ महाविदयालय तांडे, शिरपूर येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती दिपश्री गोसावी यांनी केले. शाळेतील शिक्षक मनोज बहारे यांनी शिवरायांचे विचार आजच्या समाजात कसे उपयोगी पडतील याबद्दल विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य दिनेशकुमार राणा यांनी शिवरायांच्या जीवनाबद्दल सविस्तर विवेचन केले. विदयार्थ्यांच्या जबाबदार्या तसेच कॉपीमुक्त अभियान याची उदिष्टये सांगून ते कशा प्रकारे गैरमार्गापासून वंचित राहतील, शाळेची उज्ज्वल परंपरा कशी टिकवून ठेवतील याबद्दल उदबोधन केले. शिवजयंतीचे औचित्य साधून दहावी व बारावीच्या विदयार्थांसाठी उदबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. एन.एम.आय.एम.एस. सावळदे कॅम्पस येथील प्रा.भुपेश जावरे यांनी बारावी नंतर करिअरच्या संधी, पाऊलवाटा कोणत्या व विद्यार्थानी काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले. यतिन पाटील यांनीही कॉपीमुक्त अभियानाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
कोठार आश्रमशाळेत शिवजयंती निमित्ताने कार्यक्रम
कोठार । तळोदा तालुक्यातील कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचालित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने प्रतिमापूजन व अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक मुख्याध्यापक सी एम पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील,शंकर मुठाळ, निंबा रावळे आदी व्यसपीठार उपस्थित होते. सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यानीही शिवाजी महाराजाच्या जीवनाविषयी माहिती सांगितली.जितेंद्र चौधरी,जयवंत मराठे,हंसराज महाले यांनी शिवाजी महारांजाच्या चरित्राचे विविध पैलूवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवन कार्य व चरित्र समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पन्नालाल पावरा, धनंजय मराठे,दीपक मालपुरे,योगेश चव्हाण,पंकज नरसिंगे, आदींनी परिश्रम घेतले.चेतन अहिरराव यांनी सूत्रसंचलन केले तर जयेश कोळी यांनी आभार मानले.