शिवजयंतीनिमित्त 17 मार्चपासून धुळ्यात होणार शिवचरित्र व्याख्यानमाला

0

धुळे । शि वजयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवचरित्र व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. ही व्याख्यानमाला दि.17 ते 19 मार्च पर्यंत देवपूर येथील श्रीरंग कॉलनीतील हिम हॉटेलच्या मागील मोकळ्या मैदानात होणार आहे. या व्याख्यानमालेस शिवप्रेमींसह धुळेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या विषयांवर प्रकाश
शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी देवपूरात शिवजयंती निमित्त शिवचरित्र व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. या व्याख्यानमालेस शिवप्रेमी व धुळेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो. शिवचरित्र व्याख्यानमालेचे यंदाचे सातवे वर्ष असून दि. 17 मार्चपासून दररोज संध्याकाळी 6.30 वाजता शिवचरित्र व्याख्यानमाला होणार आहे. शुक्रवार, 17 मार्च रोजी ‘श्रीमंत भारत व दरिद्री भारतीय’ या विषयावर डॉ.अभय भंडारी,सांगली, शनिवार, 18 मार्च रोजी ‘रणमर्द छत्रपती संभाजीराजे’ या विषयावर प्रा.यशवंत गोसावी, पुणे तर रविवार, दि.19 मार्च रोजी ‘गाथा शिवपराक्रमाची’ या विषयावर प्रा.प्रकाश पाठक, धुळे यांचे व्याख्यान होणार आहे.

आयोजन समितीचे सहकार्य
शिवचरित्र उत्सव समितीमध्ये महेश मुळे, निंबाजी मराठे,प्रा.भरत काळे, अनिल नागमोते,प्रा.रविंद्र पाटील, हरिष माळी, आबा जाधव, प्रथमेश गांधी, महेंद्र सोनार, सुनील दुसाने यांचा समावेश आहे. एस.बी.देशमुख, जिजाबराव पवार, बाळासाहेब भदाणे, विलास देवरे, प्रविण पाटील, बापू खलाणे, डॉ.संजय जोशी, डॉ.सुशील महाजन, सुभाष जगताप, गंगाधर माळी, डॉ.पंकज देवरे, डॉ.सचिन ढोले, पंढरीनाथ बडगुजर, दिनेश कुवर, भाग्योदय नागरी पतसंस्था यांच्या सहकार्याने शिवचरित्र व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते.

भाषणांचा लाभ घ्यावा
व्याख्यानमालेच्या आयोजनात श्रीरंग कॉलनीतील कमलाकर देशपांडे, संभाजी पाटील, कैलास दुसाने, संजय येवले, प्रदीप सोनार, प्रशांत सांगळे, विजय पाकळे, किशोर कानुगो यांचा समावेश आहे. या व्याख्यानमालेसाठी मोहन भावसार, राजेंद्र पाटील, शशीकांत कदम, बंटी चौधरी, डॉ.अमित खैरनार, माधव ठाकरे, मुन्ना काळे, कृष्णा भलकार, संदिप सोनार, कमलेश भट, वैभव पाटील, रोहित काळी आदी परिश्रम घेत आहेत. धुळेकर रसिकांनी या व्याख्यानमालेस उपस्थिती देवून अभ्यासपुर्ण भाषणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.