अमळनेर । शिवछत्रपती शिवाजी महाराजांची येत्या १९ फेबु्रवारी जयंती साजरी करण्यात येत आहे. अमळनेर येथे देखील मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवजयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती अध्यक्षपदी प्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.भुषण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर समिती कार्याध्यक्षपदी निलेश साळुंखे, उपाध्यक्ष सचिन भामरे, महिला अध्यक्ष वसुंधरा लांडगे, उपाध्यक्ष वर्षा पाटील, महिला कार्याध्यक्ष प्रा. रुचिता सूर्यवंशी व स्वागताध्यक्षपदी महेंद्र महाजन यांची निवड करण्यात आली आहे. आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, कॉग्रेस प्रदेश सरचिटणीस अॅड.ललिता पाटील, तिलोत्तमा पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थितीत निवड केली.