शिवजयंती विशेष ! जळगावात अवतरली शिवशाही

‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा, ढोल-ताशांचा गजर, लेझीम नृत्य अशा उत्साहाच्या वातावरणात शहरात शिवजयंती साजरी करण्यात आली. या निमित्त शहरात जणू शिवशाहीच अवतरल्याची अनुभूती जळगावकरांना आली. शहरातून विविध भागांतून शिवतीर्थ मैदानावर मिरवणुका आल्यानंतर ‘शिवाजी महाराज की जय..’च्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते.

गोदावरी शैक्षणिक संस्थांमध्ये शिवजयंती उत्साहात
जळगाव – गगनभेदी नजर ज्याची, पहाडासमान विशाल काया, धगधगता सुर्यही झुकतो आणि वंदितो शिवराया.. अशा या स्वराज्य निर्माण करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्‍त गोदावरी फाऊंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजीचा गजर करण्यात आला.

गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सावदा आणि भुसावळ, डॉ.उल्हास पाटील कृषी, कृषी अभियांत्रिकी, कृषी अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी, डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील संगीत महाविद्यालय, फॅशन टेक्नॉलॉजी, हरीभाऊ जावळे हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय याठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, सर्व स्टाफ, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केले, यावेळी रॅली, मिरवणूक, नाटिका सादर करुन शिवरायांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

—————————————————–
विद्यापीठात महाराजांची जयंती उत्साहात

जळगाव – कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रतिमापूजन, पथनाटय, पोवाडा, लेझीम, गीत गायन करीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवजयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी व्ही पवार यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबडेकर, सरस्वती प्रतिमा, सरदार वल्लभ भाई पटेल आदींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा. रा. ल. शिंदे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल, विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.अनिल डोंगरे, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाचे प्रभारी प्रमुख प्रा.अजय पाटील, प्रा. आर.जे. रामटेके, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल, आदी उपस्थित होते.समाजकार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अक्षय महाजन व जयेश साळुंखे याने पोवाडा सादर केला. सूत्रसंचालन डॉ.दीपक सोनवणे यांनी केले.

——————————————————
शिवजयंती उत्साहात साजरी.

जळगाव – सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय 19 फेब्रुवारी शिवाजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका कल्पना वसाने यांच्या हस्ते जिजाऊ प्रतिमेस तर माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका दिपाली देवरेयांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

———————–
शिवजयंती साजरी

 

जळगाव – रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ता. १९ शनिवार रोजी सकाळी ११ वाजता प्रशासन विभागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास श्री. प्रकाश शर्मा, प्रा. गणेश पाटील, रजिस्टार अरुण पाटील, स्टोर इन्चार्ज अजय चौधरी, जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मंगेश उपासनी, चंद्रकांत ढाकणे, महेंद्र ढोणे, आसिफ पिजारी, पवन अस्वार, कमलाकर सोनावणे, योगेश गनुरकर, राहुल कापडणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी कौतुक केले.

============================

शिवजयंती साजरी

जळगाव – धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव आणि शिरीष मधुकरराव चौधरी विज्ञान वाणिज्य व कला महाविद्यालय जळगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ शिवजयंती उत्साहात साजरी झाली.प्रसंगी लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश पी. चौधरी , राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ निलेश शांताराम चौधरी, डॉ. मिलिंद काळे , विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शाम सोनवणे आणि डॉ. प्रिती ब-हाटे समवेत महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अशोक हनवते यांनी केले.

—————————————-
शिवजयंती उत्साहात

जळगाव – शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्राचार्य ए आर राणे, उपप्राचार्य केतन चौधरी, डॉ.शैलजा भंगाळे, डॉ.जयश्री पाटील,डॉ.रंजना सोनवणे, डॉ. सुनिता नेमाडे, डॉ.स्वाती चव्हाण, प्रा.अंजली बन्नापुरे, प्रा.पंकज पाटील, प्रा.अतुल गोरडे,मनीष वनकर,प्रा.आर.शिंगणे,नीलेश नाईक,प्रा प्रविण कोल्हे, प्रा.नीलेश जोशी,विजय चव्हाण उपस्थित होते.

————————————-

शिवजयंती उत्साहात

नाशिक: (दि.19) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही.कळसकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी कल्याण विभागाचे प्र. संचालक श्री. संदीप कुलकर्णी, श्री. डॉ. सुनिल फुगारे, श्री. उदयसिंह रावराणे, डॉ. संजय नेरकर, डॉ. आर.टी. आहेर, श्री. अनंत सोनवणे, श्री. संजय मराठे, श्री. मधुकर भिसे, श्री. संदीप राठोड, श्री. प्रशांत पवार, श्री. राहूल विभांडिक, श्री. सुरेश शिंदे, श्री. दिपक थेटे, श्री. किशोर पाटील, श्री. आबाजी शिंदे, श्री. सुमित काकड, श्री. कैलास उगले, श्री. किशोर दिघे, श्री. एस.व्ही.पाटील, श्री. संतोष पाटील उपस्थित होते. यावेळी कोव्हिड-19 संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले.

—————————
रयतेला दिले रक्त

 

जळगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्ताने जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर शिवतेज प्रतिष्ठान व त्यासोबत संलग्न असलेल्या विविध सामाजिक संस्था व रेडप्लॅस ब्लड बँक,एम.जे.कॉलेज रोड,जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदानाचा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सचिन नारळे, किशोर भोसले, डॉ.हितेंद्र गायकवाड, सुरज दायमा, राहुल परकाडे, गजानन माळी राहुल जोशी या मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान,जळगाव चे अध्यक्ष श्री.दिपक दाभाडे व रेड प्लस ब्लड बँक,जळगाव चे डॉ.भरत गायकवाड,प्रकाश सपकाळे, दिपक सपकाळे, यांचेसह सपाले मोहन पाटील, पप्पू जगताप, संदिप दाभाडे, युसूफ भाई, अभिजीत कदम, किसन मेहते, अरुण चव्हाण,रोहन महाजन, अतुल उबाळे यांनी परिश्रम घेतले.

————

शिवकालीन शिवजयंती साजरी
जळगाव – शिवजयंती निमित्त शिवकाळ निर्माण करण्यात आला. रोटरी क्लबने हा शिवकाळ निर्माण केला. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांना वंदन करत शाहिरी पोवड्याने करण्यात आली. पंकज जैन,तरुण अर्तानी, निरंजन देशमुख, जयवर्धन नेवे, देवयानी रसाळ, नितीन नेवे, कृणाल सोनार, प्रा.राजेंद्र देशमुख, लक्ष्मीकांत अडावदकर, स्वप्नील नेवे, सुरेश नेवे,चिन्मय जहागीरदार, विनोद नेवे,संजय कोरके,अजय नेवे, नवीन दलाल, भिकू झवर,जगदीश नेवे आदींनी आपला सहभाग नोंदविला.

—————————-

श्री स्वामी समर्थ विघालय कुसुंबा
शिवजयंती उत्साहात साजरी…

कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा तालुका जळगाव तर्फे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२व्या जयंतीनिमित्त ३९२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ढोलताशा,झाज,लेझीम उपक्रम राबवून उत्साहात साजरी केली. कुसुंबा ग्रामपंचायत, कार्यालयापासून ते दत्त मंदिर मिरवणूक काढण्यात आली होती.शाळेच्या प्रांगणात पाळणा पोवाडे व मर्दानी खेळ सादर केले.

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील, अध्यक्ष ग स सोसायटी जळगाव ,प्रमुख पाहुणे समाधानराव पाटील, आर एफ ओ वनक्षेत्र जामनेर,ग्रामपंचायत सदस्य भुषन पाटील,प्रमोद घुगे मुख्याध्यापिका प्रतिक्षा पाटील, दिपाली भदाणे, तनुजा मोती इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते साठी अविनाश घुगे, कल्पेश साळुंखे, कामिनी पाटील, सुरेखा सावकारे व सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

————————