मुंबई: गरिबांना १० रुपयात जेवण देण्याचे शिवसेनेने निवडणुकीत आश्वासन दिले होते. आता शिवसेना सत्तेत असल्याने त्यांनी आश्वासन पूर्तीसाठी ‘शिवथाळी’ योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जानेवारीला या योजनेचा शुभारंभ असून राज्यभरात ही योजना सुरु होणार आहे. दरम्यान सवलतीच्या दरात भोजन देण्याच्या ठाकरे सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवथाळी’ योजनेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. आधार कार्ड असेल तरच शिवथाळी योजनेचा लाभ घेता येणार आहे. आधार कार्डवरील फोटो जुळला तर तरच संबंधित ग्राहकाला शिवथाळी मिळणार आहे. या अटीमुळे आता सरकारवर टीका होऊ लागली आहे. गरीबाला जेवण देत आहेत की त्यांची थट्टा करताय असा सवाल सरकारला विचारला जातो आहे.