‘शिवदुर्ग’च्या पथकाने शोधला आदित्यचा मृतदेह

0

लोणावळा : येथील लायन्स पॉईंट या ठिकाणाहून गुरुवारी बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात शिवदुर्ग मित्रच्या टिमला यश आले आहे. आदित्य मनिष कदम (वय 20, रा. पुणे), असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शिवदुर्ग मित्रच्या टिमने शनिवारी सायंकाळच्या सुमारास आदित्यचा मृतदेह शर्थीच्या प्रयत्नांनी बाहेर काढला.

शोधकार्यात आले अडथळे
गुरुवारी सायंकाळी आदित्य हा लायन्स पॉईंट येथून बेपत्ता झाला होता. ही माहिती लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या टिमला मिळाली होती. त्यानंतर लायन्स पॉईंट परिसरात शिवदुर्गने शोधकार्य सुरू केले. मंडळाचे सदस्य अनिकेत देशमुख व प्रवीण देशमुख हे दोघे दरीत उतरून मृतदेह शोधत असताना धुके व पावसामुळे शोधकार्यात बरेच अडथळे येत होते. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास आदित्यचा मृतदेह दरीत सापडला. अथक प्रयत्नानंतर सायंकाळी 4.30 वाजता त्याला रोपच्या साहाय्याने दरीतून बाहेर काढण्यात आले.

शोध पथकात यांचा सहभाग
या शोध पथकात शिवदुर्ग मित्र टिमचे अजय राऊत, राजेंद्र कडू, दिनेश पवार, महेश मसने, ब्रिजेश ठाकूर, अशोक उंबरे, राजू पाटील, रोहीत वर्तक, गणेश गिध, अनिकेत देशमुख, प्रवीण देशमुख, अजय शेलार, सुनील गायकवाड हे सहभागी झाले होते.