शिवधाम मंदिराजवळ झोपडीला लागली आग

0

जळगाव । शिवधाम मंदीराजवळील गजानन कॉलनी जवळ सुरू असलेल्या बांधकाच्या ठिकाणी झोपडीला अचानक आग लागुन संसार उपयोगी वस्तू व रोकड जळून खाक झाल्याची घटना सोमवारी 29 मे रोजी उघडकीस आली आहे.या घटनेत घरातील सर्वसामान जळाल्याने मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

बंजारा कुटूंबिय झोपडीबाहेर झोपले असताना घडली घटना; सुदैवाने कुणालाही दुखापत नाही
गजानन कॉलनी जवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी राम भरोस नगराज बंजारा हे वॉचमन म्हणून काम करीत आहेत. सुरू असलेल्या बांधकामाजवळच त्यांची झोपडी आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अचाकन झोपडीला आग लागली. ही आग नेमकी कशा मुळे लागली हे कळून आले नाही. आगीत घरातील 750 रूपये किंमतीचे गहू, पॅन्टच्या खिशात ठेवलेले 2 हजार रूपये, यासह संसारउपयोगी सामान जळून खाक झाला. संपूर्ण झोपडी जळाल्याने बंजारा यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कुणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेसंदर्भात बंजारा यांनी तालुका पोलीस ठाण्यात जावून घटनेची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगेची नोंद करण्यात आली आहे.

घरातील साहित्य पूर्ण खाक
आग लागल्याचे कळताच बंजारा कुटूंबीयांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगेत घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कुणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेसंदर्भात बंजारा यांनी तालुका पोलीस ठाण्यात जावून घटनेची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. संजय चौधरी हे करीत आहेत. उन्हाळ्यामुळे घरात गरम होत असल्याने घरातील सदस्य बाहेर झोपले होते. यामुळे कुलालाही दुखापत झाली नाही. आगेचे नेमके कारण मात्र समजून आलेले नाही.