शिवनेरीच्या विकासासाठी तातडीने २३ कोटी; अजित पवारांची घोषणा

0

मुंबई: आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात साजरी होत आहे. शिवरायांचे जन्मस्थळी शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळ्याचा कार्यक्रम झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी तातडीने २३ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. शिवनेरीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, मात्र आता तातडीने आवश्यकता असल्याने २३ कोटींचा निधी देत असल्याचे अजित पवारांनी यांनी सांगितले.