शिवनेरी पतसंस्थेतर्फे पूरग्रस्त बांधवांसाठी 25 हजारांचा मदतनिधी

0
भोसरी : येथील शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने केरळ राज्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजारांचा मदतनिधी देण्यात आला. मदतीच्या रकमेचा धनादेश उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर कार्यालयातील मुख्य लिपिक अश्‍विनी नेवे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कैलास आवटे, उपाध्यक्ष बाळू गुंजाळ, संचालक सुहास गटकळ, अ‍ॅड. सूर्यकांत काळे, शांताराम कुंभार, शांतीश्‍वर पाटील आदी उपस्थित होते.