51 हजार रुपय देऊन करणार गौरव
भोसरी : सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या सहकारी संस्थांना राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ‘सहकार भूषण’ पुरस्कार भोसरीतील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेला जाहीर झाला आहे. पुरस्काराची रक्कम 51 हजार रुपये असणार आहे. या पुरस्काराने संस्थेच्या नावलौकिकात आणखीन भर पडली आहे. राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असलेल्या सहकारी संस्थांना सहकार महर्षी, सहकार भूषण आणि सहकार निष्ठ असे पुरस्कार आणि रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक, स्मृती चिन्ह प्रदान करुन त्यांचा गौरव राज्य सरकारतर्फे केला जातो. सन 2016-17 या वर्षातील कामगिरीसाठी राज्यातील सहकारी संस्थांना पुरस्कार देण्याकरिता उत्कृष्ठ संस्थांची निवड करण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. समितीने पुरस्कारप्राप्ती संस्थांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये भोसरीतील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेला ’सहकार भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
सभासदांच्या हिताचे कार्य
पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास आवटे म्हणाले की, पतसंस्था स्थापनेपासून सभासदांच्या हिताचे कार्य करित राहिली. सभासदारांच्या विश्वासाला कधीच तडा दिला जाऊ दिला नाही. संस्थेच्या कार्याची दखल घेत अनेक पुरस्कार संस्थेला मिळाले आहेत. आता राज्य सरकारचा ‘सहकार भूषण’ पुरस्कार मिळाल्याने आंनद झाला आहे. या पुरस्काराने आणखीन चांगले काम करण्यास उर्जा, बळ मिळणार आहे. उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ, संचालक मुकुंद आवटे, सुहास गटकळ, निंबा डोळस, निलेश मुटके, अरुण डेहणकर, शांताराम कुंभार, अॅड. सुर्यकांत काळे, प्रवीण गटकळ, शांतीश्वर पाटील, ज्योती हांडे, संगीता इंगळे, बाळू भोर या संचालक मंडळाचे संस्थेच्या वाटचालीत मोठे योगदान आहे.