शिवपुतळ्याच्या मार्गातील अडथळा दूर

0

चाळीसगाव तालुक्यातील शिवप्रेमींना शिवजयंतीची अनमोल भेट

चाळीसगाव – येथील गेल्या अनेक दशकांपासून प्रतिक्षा असलेल्या चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती सिग्नल पॉइंट येथील त्रिकोणी जागेतील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा व प्रस्तावित शिवसृष्टीसाठी रस्ता अवर्गीकृत असल्याची “ती” अडचण आमदार उन्मेश पाटील यांच्या भक्कम पाठपुराव्यामुळे दूर झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याच्या नियोजीत जागेजवळून जाणाऱ्या नगरपालिका हद्दीतील सोलापूर-औरंगाबाद-धुळे रस्ता (राष्ट्रीय महामार्ग क्र. २११) अंतर्गत सिग्नल पॉइंट ते मालेगाव नाका पर्यंतचा रस्ता अवर्गीकृत करण्यास ११ फेब्रुवारी ला शासनाची शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील अश्वारूढ शिवाजी महाराज यांचा पुतळा व शिवसृष्टी उभारण्यातील शेवटचा अडथळा दूर झाला असून आमदार उन्मेश पाटील यांनी तालुक्यातील शिवप्रेमींना शिवजयंतीची अनमोल भेट दिली आहे.