वॉश आऊट मोहिमेमुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ ; दोन हजार 600 लीटर रसायनाची जागेवरच विल्हेवाट
भुसावळ- तालुक्यातील शिवपूर-कन्हाळा शिवारात नाल्याकाठी सुरू असलेल्या हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकत गूळ मोह नवसागर मिश्रीत दोन हजार 600 लिटर कच्चे रसायन व जळत्या भट्टीवरील 200 लिटर गरम पक्के रसायन तसेच 34 लिटर तयार दारू असा मिळून दोन लाख 21 हजार 900 रुपये किंमतीचा माल जागीच नष्ट केला. घटनास्थळावरून पोलिसांनी बैलजोडीसह बैलगाडी जप्त केली असून आरोपी सुभान तुकडू गवळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली आहे. ही कारवाई डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक सुरेश वैद्य, गणेश सोनवणे, प्रेमचंद सपकाळे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचार्यांनी शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास केली. या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.