भुसावळ : तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या तीन गावठी दारू भट्ट्यांवर तालुका पोलिसांनी एकाचवेळी धाड टाकत 17 ड्रममधील तीन हजार 400 लीटर कच्चे रसायन जागीच नष्ट केले तसेच 85 लिटरसह एक लाख नऊ 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकाचवेळी झालेल्या कारवाईने अवैध धंदे चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली.
तिघा दारू विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल
पहिल्या कारवाईत संशयीत गफूर बुधु गवळी यास ताब्यात घेण्यात आले. संशयीताकडून गूळ, मोह नवसागर मिश्रित दारू गाळण्याचे कच्चे सहा ड्रम रसायन व तयार दारू मिळून 38 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच संशयीत सालीम हसन गवळी याच्या ताब्यात दारू गाळण्याचे 06 ड्रम कच्चे रसायन व तयार दारू मिळून 38 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली तसेच तिसर्या कारवाईत खलील हसन गवळी याच्या ताब्यातून दारू गाळण्याचे पाच ड्रम कच्चे रसायन व तयार दारू मिळून 32 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातलुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण, हवालदार युनूस इब्राहिम शेख, विठ्ठल फुसे, रीयाज काझी, संदीप बडगे, गणेश राठोड, जितेंद्र साळुंखे, शिवाजी खंडारे, पोलीस पाटील रेवसिंग पाटील आदींच्या पथकाने केली.