पिंपरी चिंचवड : वाल्हेकरवाडीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेतर्फे हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना न्यासला छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन बनविण्यासाठी तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. सर्व धारकर्यांतर्फे संभाजी भिडे गुरुजी यांनी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांच्या निवासस्थानी हा धनादेश देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, संजय जठार, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुणे जिल्हा प्रमुख अविनाश मरकळे, संपर्क प्रमुख सचिन थोरात, चिंचवड विभाग आणि वाल्हेकरवाडीतील धारकरी संदीप वाल्हेकर, गजानन चिंचवडे, शेखर चिंचवडे, आनंदा वाल्हेकर, सुभाष वाल्हेकर, युवराज वाल्हेकर, सोमनाथ मुसुडगे, सोमनाथ हरपुडे, हेमंत गवंडे, राजकिरण ठाकूर, तुषार वाल्हेकर, धनंजय म्हस्के, प्रवीण रसाळ,
बाळू शिवले, संतोष वाघ, गणेश भुजबळ, सुयोग वाल्हेकर, तन्मय वाल्हेकर, अभिषेक वाल्हेकर, रसिका वाल्हेकर आदी उपस्थित होते.
धन संकलनाचे आवाहन
यावेळी भिडे गुरुजी म्हणाले की, वाल्हेकरवाडी व चिंचवड परिसरातील युवकांनी पुढच्या महिन्यात सुरू होणार्या धनसंचय मोहिमेत सहभागी व्हावे, तसेच या सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना न्यासला कर्तव्यपूर्ती म्हणून पिंपरी-चिंचवड परिसरातून तीस किलोपर्यंतच्या सुवर्ण संचयनासाठी धनाचे संकलन करा.
जलपर्णीमुक्त पवनामाई
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे सध्या जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई अभियान सुरू असून, हे कार्य समजावून घेऊन प्रदीप वाल्हेकर व सोमनाथ मसूडगे यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी गोसेवक खिलारप्रेमी संदीप वाल्हेकर यांच्या गोशाळेला भेट दिली. यावेळी वाल्हेकर कुटुंबियांतर्फे गुरुजींना विठ्ठल मूर्ती भेट दिली.