शिवमची जल्लोषात मिरवणूक

0

जळगाव । येथील शिवम वानखेडे हा झी टीव्हीवरील डान्स इंडिया डान्स या स्पर्धेत अंतिम पाच स्पर्धकांमध्ये पोहचला असुन मेगा ग्रँन्ड फिनालेच्या आधी सोमवारी सकाळी 10 वाजता शहरात त्याचे आगमन झाले. यावेळी शिवमचे रेल्वे स्टेशनवर स्वागत जल्लोषात करण्यात आले. याप्रसंगी शिवमची सजविलेल्या बग्गीतून मोठ्या उत्सहात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जळगावकर नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शिवमचे स्वागत आमदार सुरेश भोळे, महापौर ललीत कोल्हे,माजी महापौर विष्णू भंगाळे, दिनकर बागडे, भगवान सोनार, नरेश बागडे,अखिल तिलकपुरे,पवन जैन योगेश विसपुते यांनी केले. त्यानंतर शिवमची आई सुवर्णा वानखेडे व वडील शिरीष वानखेडे यांनी त्याचे औक्षण करून त्याचे स्वागत केले.

पोलीसांनी वाढविला उत्साह
वाहतुक पोलीस शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांनी सहभाग घेऊन शिवमच्या उत्साह वाढविला . रँलीमध्ये शिवमची माहिती सांगणरे एलईडी टिव्ही शोचे वाहन पुढे होते. त्यानंतर ढोलपथक,तसेच सुवर्णकार समाजाच्या महिला व ग्लेडेटियर डान्स क्लासेसच्या महिलांनी नववारी साडी तर पुरूषानी नेहरू कुर्तापायजामा व फेटा या वेशात रँलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दुध वाटप
नंदिनीबाई मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापिका चारूलता पाटील उपमुख्याध्यापक आर.आर.पाटील,एम.जी.पिंपळे,पराग जावळे,जि.एल.भारंबे,एस.के चोपडे,बि.जी.ढोले, बी.आर.बेलदार, महाजन, तायडे व शिक्षकवदांनी शिवमचे स्वागत केले. शिवमला वोटींग करण्यासाठी व त्याचे स्वागत करण्यासाठी शाळेसमोर उभे राहुन मुलींनी टाळ्यावाजवून त्याचे स्वागत केले. स्वातंत्र्य चौक येथे सुवर्णकार संस्थेतर्फे सर्वाना दुध वाटप करण्यात आले.

वोटींग करण्याचे आवाहन
शिवम हा अंतीम फेरीत पोहचला असून त्याला अंतिम विजेता होण्यासाठी आता नव्याने वोटिगलाईन रविवार पासुन सुरू झाली असून गूरूवारी दि.15 पर्यंत दुपारी 2 वाजेपर्यत मोबाइलवर 18001201909या नंबरवर फक्त मिस काँल करावे तसेच झिटिव्हीच्या इन्सटाग्रामवर पर शिवम च्या फोटो ला लाइक करण्याचे आवाहन आ.राजुमामा भोळे, महापौर ललीत कोल्हे, अखिल तिलकपुरे,नरेश बागड़े, भगवान सोनार, शिरीष वानखेडे,लक्ष्मीकांत सोनार यानी केले आहे.

निवासस्थानी सांगता
शिवम यांच्या श्रध्दा काँलनी येथील निवासस्थानी रँलीची सांगता झाली. परीसरात रांगोळी काढून फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. रँली यशस्वितेसाठी युवा शक्ती फाउंडेशनचे विराज कावडिया, अमित श्रीश्रीमाळ, सुवर्णकार समाजाचे संजय विसपुते, उपहार फाउंडेशनचे पवन जैन, लक्ष्मीकांत सोनार, रोशन रायसोनी, पोलीस स्केटिग क्लबचे प्रशिक्षक विनोद अहिरे, मुद्रणचे प्रतीक बाविस्कर, कुणाल तिलकपुरे, स्वप्नील तायडे, रोहीत चावरीया, मिलींद भालेराव, शरद रणधिर, पंकज रणधीर, मनोज मेटकर आदिनी परीश्रम घेतले.