भोपाळ- काल मध्य प्रदेशसह देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची निकाल लागला. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. सर्वाधिक लक्ष होते ते मध्य प्रदेशच्या निवडणुकीवर. मध्य प्रदेशमध्ये १५ वर्षापासून भाजप सत्तेत होते. दरम्यान यावेळी त्यांना सत्ता सोडावी लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत शिवराजसिंह चौहान सरकारमधील तब्बल १३ मंत्री पराभूत झाले आहे. २३० पैकी कॉंग्रेसला ११४ तर भाजपला २०१९ जागांवर विजय मिळाले आहे.
अंतर सिंह आर्य (सोंवा), ओम प्रकाश (डिंडौरी), ललिता यादव (छतरपुर), दीपक जोशी (हटपिपलिया), जयभान सिंह पावैया (ग्वालियर), नारायण सिंह कुशवाहा (ग्वालियर, दक्षिण), रुस्तम सिंह (मुरैना), उमा शंकर गुप्ता भोपाल (भोपाल दक्षिण पश्चिम), अर्चना चिटनिस (बुरहानपुर), शरद जैन (जबलपुर), जयंत मलैया ( दमोह), बालष्ण पाटीदार ( खरगोन), लाल सिंह आर्य ( भिंड) आदी शिवराजसिंह सरकारमधील मंत्र्यांचा पराभव झालेला आहे.