भोपाळ-मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. आतंकवादी संघटना सिमीपासून धोका असल्याने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना झेड प्लस सुविधा दिली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत असणार आहे.
३१ ऑक्टोबर रोजी भोपाळ तुरुंगातून सिमी संघटनेशी संबंधित ८ आरोपी फरार झाले होते. त्यांचा एनकाउंटर करण्यात आला. त्यावेळी शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री होते. त्यामुळे ते सिमीच्या लक्षावर असतील म्हणून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.