शिवरायांचा अपमान करणार्‍यांवर गुन्हा दाखल करा

0

बोदवडमध्ये शिवप्रेमींचे निवेदन : सोनी टीव्हीवरील कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख

बोदवड : सोनी टीव्हीवर प्रसारीत होणार्‍या ‘कोण बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात 6 रोजी प्रसारीत झालेल्या 58 व्या भागात एका प्रश्‍नादाखल उत्तरात छत्रपती शिवरायांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याने शहरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून या प्रकरणी सोनी चॅनलमधील संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शहरातील शिव प्रेमींतर्फे तहसीलदार रवींद्र जोगी व पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे यांना शुक्रवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.

छत्रपती शिवरायांचा एकेरी केला उल्लेख
सोनी टीव्हीवरील ‘कोण बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात कार्यक्रमात ‘कोणते राजकीय शासक मुगल सम्राट औरंगजेबाच्या तत्कालीक जवळ’ होते या हिंदी प्रश्नाच्या चार पर्यायी उत्तरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला तर अन्य तीन पर्यायांमध्ये ज्या तीन प्रशासकांची नावे घेण्यात आली त्यांचा मान-सन्माम देऊन त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असून सोनी टीव्ही चॅनलमधील संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर आबा माळी, रामदास पाटील, शांताराम सपकाळ, नईम खान, बाळु राउत, अजय पाटील, अनिल देवकर, संजय काकडे, अनंता वाघ, सचिन राजपूत, शांताराम कोळी, निवृत्ती ढोले, डॉ.देविदास पाटील, समाधान पाटील, अमर जाधव, असीप मन्यार, रुपेश गांधी, राजेंद्र फिरके, अमोल पाटील, सचिन जैस्वाल यांच्यासह बोदवड तालुक्यातील शिवप्रेमींच्या स्वाक्षर्‍या आहेत.