…शिवरायांचा आठवावा प्रताप!

0

धुळे । सार्वजनिक शिवजयंती शहरात मोट्या उत्साहात पार पडली. संपूर्ण शहर ढोल ताशा च्या गजरात दणाणून गेले होते. भगवामय झालेल्या शहरात अनोखी शिवशाही अवतरली होती. बुलेटवर स्वारी केलेल्या नवयुकांच्या रॅली ने संपूर्ण धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते संघटना, संस्था, पक्ष, शाळा, महाविद्यालयाच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सवात सामील होऊन विविध शिवकालीन वेशभूषा सादर करण्यात आल्या. यामध्ये जिल्हा मराठा युवक मंडळ व मराठा कमिटी मोर्चाच्या वतीने संयुक्तपणे यंदा शिवजयंती सादर करण्यात आल्याने एक वेगळाच आनंद, उत्साह शहरात दिसून आला. त्यामुळे संपुर्ण शहर भगवेमय झाले होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

शहरात शिवजयंती शांततेत पार पाडण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक एस चैतन्य, उपपोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता या मध्ये सीसीटीव्ही केमेरे देखील विविध भागात बसविण्यात आले होते. कोणताही अडथळा शिववजयंती दरम्यान येऊ नये या साठी आयोजकांसह पोलीस प्रशासनाने खबदारी बाळगली होती.

मुख्य मार्गावरून मिरवणुकीचे आकर्षण

शोभा यात्रेचा प्रारंभ पारोळा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दुपारी 4ला सुरुवात करण्यात आली. विविध मान्यवर तसेच सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांनी या वेळी उपस्थिती लावली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, पवनपुत्र व्यायाम शाळा, चैनी रोड, मिरच्या मारोती चौक, रामभाऊ दाढीवाला खुंट,मरीमाता चौक,सम्मान लॉज,राजकमल टॉकीज, आग्रा रोड, कराचीवाला खुंट, गांधी पुतळा येथे समारोप करण्यात आला.

राजकीय मतभेद सावरला: धुळे शहरात अनेक राजकीय पक्ष आहेत या मध्ये विविध राजकीय संघटना देखील सक्रिय आहे मात्र या वेळेस झालेल्या शिवजयंती हि मराठी अस्मितेचा मन वाढवणारी होती शहरात सध्या राजकीय वातावरण विविध वादातून तापले आहे मात्र सगळे राजकीय मतभेद बाजूला सारून सर्व पक्षीय संघटना धुळेकरांची ही अस्सल शिवजयंती मोहोस्तव डोळ्याचे पाळणे फेडणारी होती. एक वेगळा उत्साह शिवाजी महाराजांच्या आदर्शवत ठेवत मिरवणुकीच्या प्रत्येका मध्ये संचारला होता.

नवापूर । नवापूर नगरपालिका येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. सर्व प्रथम महाराजाचा पुतळ्याला नगराध्यक्षा रेणुका गावीत, नगसेविका मेघा जाधव, ज्योती जयस्वाल, नगसेवक चंद्रकात नगराळे, शिरीष प्रजापत, माजी नगरसेवक विनय गावीत, शिवसेना तालुकाप्रमुख गणेश वडनेरे, भालचंद्र गावीत कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे, कैलास गवते, गिरीष सागळे, दिपक पाटील, संतोष सोनार, आनंद साळवे आदीनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी नगसेवक विनय गावीत यांनी शिवरायांबदल माहीती दिली. तर दुसर्‍या छायाचित्रात नवापुर पोलिस स्टेशन येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. सर्व प्रथम महाराजाचा प्रतिमेला पोलिस निरीक्षक रामदास पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा, संतोष भंडारे, पो.का.दिलीप चौरे, तोरण नाईक, नितिन मराठे, प्रशांत यादव, मोहन साळवे, योगेश थोरात, रितेश हिंदवे, विजय गवळे, रोहीदास भिल, प्रविण मोरे, मुकेश पवार आदी उपस्थित होते.