शिवरायांचे गुण अंगीकृत करा -डीआरएम आर.के.यादव

0

रेल कामगार सेनेतर्फे भुसावळात शिवजयंती उत्साहात साजरी

भुसावळ- छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यप्रणाली वेगळी असल्याने त्यांना नागरीकांच्या समस्या सोडवण्यास व स्वराज्य निर्माण करण्यास अडचणी आल्या नाहीत. शिवरायांची कार्य पद्धती त्यांचे गुण सर्वांनीच अंगिकृत करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी येथे केले. रेल्वे कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष आनंदराव अडसुळ यांच्या आदेशाने रेल कामगार सेना भुसावळ विभागातर्फे डीआरएम कार्यालयासमोर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथी प्रमाणे) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी डीआरएम यादव यांनी सर्व प्रथम मराठीत सगळ्यांना माझा नमस्कार अशी मराठीतून सुरुवात करीत उपस्थितांची मने जिंकली. शिवरायांची शासन चालवण्याची पद्धत, कार्यप्रणाली, अष्टप्रधान मंडळाची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
प्रमुख पाहुणे सीएमएस सम्पतराय, सिनी. डीईएन (समन्वय) राजेश चिखले, सिनी.डीईई जनरल लाखेरा, सिनी.डिईई टीआरडी पी.व्ही.ओक, सिनी.डीपीओ गांगुर्डे, सिनी डीईएन उत्तर विभाग दीपककुमार, सिनी डीपीईएन पूर्व विभाग आर.पी.चव्हाण, सिनी.डीएमएम आर.आर.पाटील, रेल कामगार सेनेचे महासचिव दिवाकर देव, केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मालवदकर, राजा कुट्टी, राजेश लखोटे, प्रदीप भुसारे, विनोद वाघे, राकेश पाठक यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. जनरल सेक्रेटरी दिवाकर देव यांनी डीआरएम यादव यांचे विशेष आभार मानले. छत्रपती शिवरायांप्रमाणे गनिमी काव्या सारखे लढुन कामगारांचे प्रश्न सोढवा व शिवरायांचे गुण आत्मसात करा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. ललितकुमार मुथा यांनी प्रास्तविक व सूत्र संचालन केले तर राजेश लखोटे यांनी आपले सखोल विचार व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
ललितकुमार मुथा, राजेश लखोटे, प्रदीप भुसारे, विनोद वाघे, राकेश पाठक, प्रीतम टाक, मंगेश शेलोडे, योगेश माळी, राजेंद्र बोकाडे, कमलाकर बाणाईत, प्रकाश करसाले, एम.के.शहा, शंकर कुमावत, सुरेंद्र यादव, विजय सीताराम तायडे, महेंद्र सोनवणे, आनंद देवकर, संजय जगन्नाथ चौधरी, मोहन राजपूत, अतुल अमोदकर, विनोद मासरे, शेखर पवार, अजय बोरसे ,पंकज पाटील, विशाल कुंवर, संदीप जावले, योगेश अंभोरे, नीलेश गेडाम, सुरज रायकवार, सुरज सागर, ज्ञानदेव पाटील, दयाल, साम्बर पवार, अनिल मासरे, दीपक महाडिक, के.के. मालपाणी, महेंद्र सोनवणे, हाजी रहीमुद्दीन, शेख इकबाल, अब्दुल अजीज, शेख शब्बीर, वीरकुमार ममैय्या, नरेश शर्मा व 300 इतर कार्यकर्ते हजर होते. शिवजयंती उत्सव समिती भुसावळतर्फे सर्व मान्यवरांचा नमा शर्मा, गोलू कापडे यांच्यातर्फे विशेष स्मृतचिन्ह देवून गौरविण्यात आले.