शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान लांच्छनास्पद

0

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांचे मत
जामनेर – पुरोगामी म्हणून नावलौकिक असणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात भाजपाच्या राम कदम यांनी स्त्री जाती विषयी केलेले वक्तव्य हे लांच्छनास्पद असून भाजपाच्या कार्यकाळात चांगल्या संस्कृतीला विकृत बनविण्याचे काम केले जात आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी जामनेर येथे राम कदम यांच्या विरोधातील निषेध आंदोलनात मांडले. राम कदम यांनी घाटकोपर येथे दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांविषयी बेताल वक्तव्य केले होते. त्याचा निषेध जामनेरात राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आला. कदम यांच्या प्रतिकृतीचे नगर परिषदेच्या समोरील जिजाऊ चौकात दहन करण्यात आले. महिला वर्गाचा अपमान करण्यासाठी भाजपा पक्षात चढाओढ लागली असल्याचे दिसून येते. तसेच कदम यांच्या वक्तव्याचा आधार घेत.

यांची होती उपस्थिती
मुंबईत बऱ्याच मुलींचे अपहरण करण्यातही भाजपाच्या नेत्या व पदाधिकांऱ्यांचा हात असू शकतो असा सवाल कल्पना पाटील यांनी यावेळी केला. त्या पद्धतीने पोलिस प्रशासनाने तपास करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्योती पाटील, मिना शिंदे, संजय गरूड, राजू पाटील, अभिषेक पाटील, किशोर पाटील, जितेश पाटील, राजेंद्र चौधरी, प्रभू झाल्टे, प्रल्हाद बोरसे, नरेंद्र जंजाळ रवि बंडे आदिसह पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.