शिवलिंगाचा अपमान केला नाही, पावित्र्य राखण्यासाठी ते झाकले ; सलमान खानचे स्पष्टीकरण

0

नवी दिल्ली-सलमान खान आगामी ‘दंबग ३’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूवात झाली आहे. नर्मदेच्या घाटावर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. चित्रीकरणादरम्यान शिवलिंग लाकडी वेष्टनाने झाकल्याचे काही फोटो सोशल मीडियवर व्हायरल झाले. यावरून सलमान खानने हिंदुच्या भावना दुखवल्याचा आरोप होत आहे. यावरूनच काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद रंगला. दरम्यान सलमान खानने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. चित्रीकरणावेळी कोणतीही हानी पोहोचू नये म्हणून शिवलिंगाच्या संरक्षणासाठी आणि पावित्र्य राखण्यासाठी ते वेष्टनाने झाकण्यात आल्याचे सलमानने स्पष्ट केले आहे. यात कोणाच्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता केवळ सुरक्षेच्या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आल्याचे सलमान म्हणाला.

हिंदूच्या भावना दुखावण्याच्या घटना मध्य प्रदेशमध्ये वारंवार घडत असल्याचा आरोप भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी केला. यामागे जी व्यक्ती असेल त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणीही शर्मा यांनी केली. यावरून भाजप हे कोत्या मानसिकतेचे आहे असे उत्तर देत काँग्रेसने दिले आहे.