पुणे । शिवशाही बसचे जाळे आणखी विस्तारीत होणार आहे. एसटी कडून नवीन मार्गांसाठी सध्या चाचपणी सुरू आहे. शिवशाहीच्या वाढीव मार्गांसाठी पुणे विभागाकडून एकूण तीन प्रस्ताव पाठविण्यात आले असून, पंढरपूर-जुन्नर, कुर्ला-जुन्नर, पनवेल-जुन्नर यापैकी एका मार्गाची निवड होणार आहे.
बारामती करिता शिवशाहीचा प्रस्ताव
लाभत असून, कमी दरात प्रवाशांना आरामदायी सेवा मिळत असल्याने शिवशाहीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुण्याहून हैदराबाद, बारामतीकरिता शिवशाहीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, तो मंजूर झाल्यास या मार्गावरही वातानुकूलित शिवशाही धावू लागेल. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता अन्यही मार्गांवर शिवशाही सुरू करण्याचा विचार असल्याचे विभागनियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगीतले.
शिवशाही बस आरामदायी श्रेणीत मोडत असल्याने जवळच्या अंतरासाठी ती सुरू करता येणे शक्य नाही. लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा विचार करून वातानुकूलित सेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे पुण्याहून जुन्नरसाठी शिवशाही बस सुरू करता येणार नाही, असेही या वेळी सांगण्यात आले. पुण्याच्या पिंपरी-चिंचवड आगारातून हैदराबाद व स्वारगेट येथून बारामतीकरिता शिवशाही सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सध्या बारामती व हैदराबादसाठी साधी बस व हिरकणी उपलब्ध आहे.