शिवशाही बसचा अपघात, वाहक ठार

0

कोल्हापूर : पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी टोल नाका येथे शिवशाही बसचा अपघात झाला आहे. या झालेल्या अपघातात बसचा वाहक ठार झाला असून १९ प्रवासी जखमी आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.

पुण्याहून ही बस कुडाळला जात होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास किणी टोल नाक्याजवळ समोरच्या ओमनी गाडीस ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यापासून बाजुला गेली. डाव्या बाजुला बस कलंडून हा अपघात झाला. यात वाहकाचा मृत्यू झाला तर बसमधील १९ प्रवासी जखमी झाले आहेत. सागर सुधाकर परब ( वय ३०, रा. कलेली, ता. कुडाळ) असे वाहकाचे नाव असून जखमींमध्ये कुडाळ आणि पुणे येथील प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती आहे.