हे देखील वाचा
संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात नाशिक आगाराची शिवशाही बस ( एम. एच ०९, ईएम १२९१) पुण्याहून नाशिककडे प्रवाशी घेऊन जात होती. दरम्यान, घारगाव पुलावर उताराला बसचे मागचे एक चाक निखळुन रस्त्यावरुन तीनेशे मीटर खाली घरंगळत गेले. ही बाब चालक बाबा बच्छाव यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत गाडी थांबविली आणि बसमधील चौदा प्रवाश्ंयाना गााडीतून खाली उतरवले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे चौदा प्रवाशांचे जीव वाचले. बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप असून त्यांना दुसऱ्या बसमधून मार्गस्थ करण्यात आले.