शिवसप्ताह प्रबोधनपर स्पर्धेचे बक्षिस वितरण

0

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने फेब्रुवारी २०१९ मध्ये महानगरपालिका माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या शिवसप्ताह प्रबोधनपर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ महानगरपालिकेच्या केशवनगर शाळेत घेण्यात आला. महापौर राहूल जाधव यांनी यशस्वी विद्यार्थाना “शिवाजी द मॅनेजमेंट गुरु” हे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी नगरसदस्य राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, स्विकृत सदस्य विठ्ठल भोईर, माजी नगरसदस्य मारुती भापकर, शिक्षणधिकारी पराग मुंढे, शिवजयंती उत्सव समिती, पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते प्रकाश जाधव, जीवन बो-हाडे, सागर तापकीर, नकुल भोईर आदि मान्यवर उपस्थित होते.

महापौर राहूल जाधव म्हणाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता १० वी मध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवतील त्यांना महापालिकेतर्फे १ लाख रुपये प्रोत्साहन पर बक्षिस महापालिकेतर्फे देण्यात येते. असे सांगुन जास्तीत जास्त विद्यार्थानी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व बक्षिसास पात्र होण्याकरिता जास्तीत जास्त अभ्यास करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे विद्यार्थाना आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर निबंध, रांगोळी व चित्रकला अशा विषयांवर शिवसप्ताह स्पर्धा घेण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये ८६०७ विद्‌यार्थानी सहभाग घेतला होता. त्यातील १६७ यशस्वी विद्यार्थाना गौरविण्यात आले.