शिवसेनतर्फे धरणगावात रस्त्यांचे भूमिपूजन, पाण्याच्या टँकरचे लोकार्पण

0

धरणगाव । आज धरणगाव शहरात शिवसेनेची तालुका बैठक संपन्न झाली. सुरूवातीला हिंदूकुलभूषण विरपुरुष महाराणा प्रतापसिंह यांच्या तैलचित्राचे अनावरण गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. प्रतिमा अनावर करुन मान्यवरांच्याहस्ते पूजन करण्यात आले. नगरपरिषदेला धरणगाव राजपूत समाज पंच मंडळाकडून महाराणा प्रतापसिंह यांची प्रतीमा भेट देण्यात आली. यानंतर जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ यांनी आपल्या मनोगतातून शिवसेना जळगाव जिल्ह्यात करीत असलेल्या कामांबद्दल व धरणगाव शहरात भविष्यात काय-काय योजना शिवसेनेच्या आहेत, याबद्दल माहिती दिली. 30 मे ते 5 जून या कालावधीत भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यात शेतकरी कर्ज मुक्त कसा होईल, शेतकर्‍यांसाठी सरकारच्या विरोधात आंदोलन उभारुन लोड शेडींग बंद करण्यासाठी अधिकार्‍यांना सांगून शेतकर्‍यांच्या नेहमी शिवसेना पाठीशी उभी राहील व शेतकर्‍यांना न्याय देईलच असेही जिल्हाप्रमुख ना. गुलाबराव वाघ यांनी सांगितले.

विकास कामांची दिली माहिती
धरणगाव शहरात लोकमान्य टिळक तलावाचे सुशोभिकरण करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल व कंडारी, भोणे ते जांभोरे रस्त्याचे मंजुरीकरण सुध्दा झाले आहे. त्याही कामास लवकरच सुरुवात होईल. प्रत्येक कॉलनीत रस्ता डांबरीकरणाचे काम, शहराचा विकास फक्त शिवसेनेच्याच माध्यमातून होतोय, वॉटर फिल्टरसारखे काम जोरात सुरू, उड्डाण पूलावर आमदार निधीतून हायमास्ट लॅम्प लावले, प्रत्येक ठिकाणी एलईडी लाईट लावण्याचे काम चालू आहे व विकास कामात अजून भर पडेलच व धरणगाव शहराचा पूर्ण विकास शिवसेनेच्या माध्यमातून करु असेही ना. पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमात नगरसेवक सुरेश महाजन, उज्वला साळुंखे यांच्या सहकार्याने शहरात पिण्याच्या पाण्याचे टँकरचे लोकापर्ण शिवसेना जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांच्याहस्ते करण्यात आले.

बैठकीत यांची होती उपस्थिती
कार्यक्रमात महिला जिल्हाध्यक्षा महानंदाताई पाटील, जि.प. सदस्य गोपाल चौधरी, नगराध्यक्ष सलीम पटेल, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, तालुका प्रमुख गजानन पाटील, उप तालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, प.स.उपसभापती प्रेमराज पाटील, प्रमोद पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख जनाअक्का पाटील, पी.एम.पाटील, नगरसेवक उज्वला साळुंखे, मंदाताई धनगर, नगरसेवक सुरेश महाजन, भगवान चौधरी, विनय भावे, वासुदेव चौधरी, अजय चव्हाण, विलास महाजन, गोपाळ चौधरी, विशाल महाजन, धिरेंद्र पुरभे, लक्ष्मण महाजन, बापू चौधरी, भय्या पाटील, वसीम पिंजारी, सतीष बोरसे, राहुल रोकडे, पुंडलीक पाटील, कमलेश बोरोले, दीपक पाटील, भटू महाजन, निलेश पाटील, विनोद रोकडे, उमेश महाजन आदी यावेळी उपस्थित होते.