औरंगाबाद: संपूर्ण राज्याला परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांचे यात प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. ते दौऱ्यावर रवाना झाले असून औरंगाबाद येथे विमानाने पोहोचले आहे. औरंगाबाद विमानतळावरून ते वाहनाने नुकसानग्रस्त भागाकडे रवाना झाले आहेत. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका औरंगाबाद जिल्ह्याला बसला आहे.
राज्यात सत्ता स्थापनेबाबत रणकंदन उठले असताना उद्धव ठाकरे हे नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले आहेत. मुख्यमंत्री पदावरून भाजप-सेनेत चढाओढ सुरु आहे. त्यामुळे शपथविधी लांबणीवर गेले आहे. मुख्यमंत्री पदासह मंत्रीपदाच्या समसमान वाटपासाठी शिवसेना आग्रही असल्याने सत्ता स्थापनेचे घोडे अडून पडले आहे.