मुंबई: विधानसभा निवडणुकीत शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे. शिवसेनेकडे सध्या अपक्षांनी पाठींबा दिल्याने ६३ आमदारांची सख्या जमली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसैनिक आक्रमक झाले असल्याने अद्याप सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही. दरम्यान आज सत्ता स्थापनेबाबत खलबते करण्यासाठी मुंबईतील शिवसेना भवनात नवनियुक्त आमदार आणि पक्ष नेत्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.
थोड्याच वेळात बैठक सुरु होणार असून त्यानंतर सत्ता स्थापने संदर्भातील माहिती समोर येणार आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेत तणावाची स्थिती आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहे. त्यामुळे अधिक तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान आज शिवसेनेचा गटनेता ठरणार असून एकनाथ शिंदे यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.