रत्नागिरी : नाणारमध्ये जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना आमदार राजन साळवींना गुरुवारी अटक करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौर्यापूर्वी ही कारवाई झाल्याने नाणारमधील राजकीय वातावरण तापले आहे. नाणार प्रकल्पाला होणार्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सद्या जमावबंदीचे आदेश लागू आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना आमदार साळवी यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली. शिवसेना नाणार विरोधात आक्रमक असून, मनसे आणि नारायण राणे यांनीदेखील प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. मात्र, हा विरोध झुगारुन लावत केंद्रातील भाजप सरकारने नाणार प्रकल्पासाठी सौदी अरेबियाच्या अराम्को कंपनीशी करार केला.